कर्जत (प्रतिनिधी) : कोळवडी (कर्जत ) येथील पत्रकार, कर्जत तालुका प्रेस क्लबचे सचिव अस्लम पठाण व त्यांच्या कुटुंबियांवर आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवारीने हल्ला झाला आहे.

यामध्ये त्यांचे वडील, आई हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तलवारीने हल्ला झाल्यानंतर  पठाण कुटुंबीय दवाखान्यात दाखल झाले, तेथे पण येऊन हल्लेखोराचे नातेवाईक धमकी देत असल्याचे अस्लम पठाण म्हणाले. तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा कधी बसणार हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पडताळणी चालू आहे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.