कर्जत (स्मार्ट कर्जत वृत्तसेवा) :- ऐंशी हजार रुपये व्याजाने देऊन 5 टक्क्याने पैशाची मागणी करणाऱ्या सावकाराविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी अश्याच एका सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नंदकुमार मोहन माळवदकर, वय 38, राहणार बाबुळगाव खालसा, तालुका कर्जत यांचे फिर्यादी वरून गु रजि नंबर 191/2021 भा द वी कलम 341, 323,504,506 महा सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे विठ्ठल यादव काळे (देशमुख) रा करपडी ता कर्जत याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी विठ्ठल यादव काळे (देशमुख)  यांने त्याच्याकडे कोणताही सावकारी परवाना नसताना बेकायदेशीर रित्या ८०,००० रुपये महिना ५ टक्के व्याजाने दिले. त्याबदल्यात एकूण 53,000 रु दिले तरी तेवढेच पैसे रुपये व्याज म्हणून मागत होता त्यासाठी मोटरसायकल अडवून फिर्यादीस वाईट पद्धतीने वेळोवेळी शिवीगाळ करून तू 50 हजार रुपये नाही दिले तर तुला पाहून घेईल अशी दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे.