कर्जत (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. कर्जत तालुक्यातील रस्त्यासाठी 3.95 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनीही ट्विट करून याबत माहिती दिली आहे.
       अरणगाव, वाळकी , देऊळगाव, खांडवी, भोसे, रुईगव्हान, कुळधरण, बारडगाव सुद्रीक ते राज्य महामार्ग 54 असा हा मंजूर रस्ता असणार आहे. प्रगती का हायवे मधून या रस्त्यांसाठी 3.95 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे.