कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेले आबासाहेब वीरपाटील आज 30 एप्रिल रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. वीर आबा नावाने सर्वसृत आबासाहेब मिरजगावचे रहिवासी आहेत. आबासाहेब वीरपाटील मिरजगांव ग्रामपंचायत येथे 23 वर्षे तर कर्जत पंचायत समिती येथे 14 वर्षे सेवेत होते. ते लिपिक पदावर कार्यरत होते. मिरजगांव ग्रामपंचायत च्या विद्यमान उपसरपंच संगीता वीरपाटील यांचे पती आहेत. सामाजिक, राजकिय,शैक्षणिक, क्षेत्रामधून अनेकांनी आबांना सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आबासाहेब विरपाटील म्हणाले की, मी नोकरीमधून सेवानिवृत्त होत आहे परंतु सार्वजनिक जीवनातून आणि सामाजिक बांधिलकीतुन कधीही निवृत्त होणार नाही.
माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे म्हणाले की प्रशासनामध्ये परिपूर्ण माहिती असलेले व्यक्तिमत्व होते, त्यांची उणीव जाणवल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या अनुभवाचा मिरजगाव ग्रामपंचायतीला नक्की फायदा होईल.


