कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी चालू असलेल्या अवैध धंद्यावर कर्जत पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.दारू अड्ड्यावर छापेमारी करत 155870 रु चा माल कर्जत पोलिसांनी जप्त केला असून एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ब्रेक द चैन कालावधीत सुद्धा अवैध दारूविक्री करणाऱ्या लोकांवर गोपनीय माहिती काढून कर्जत पोलिसांनी कारवाई केली आहे.
1. जाफर बंडूभाई शेख रा बेलवंडी
2.महादेव लक्ष्मण नवले रा चांदा
3. किरण रघुनाथ गंगावणे रा चांदा
4.भरत चद्रकांत घालमे रा शिंदा
5.जयश्री हनुमंत पवार रा कर्जत
6.राजेंद्र विश्वनाथ भोसले रा टाकली खंडेश्वरी
7.इस्राईल शब्बीर पठाण रा टाकळी खंडेश्वरी
8.शालन सोनबा शिंदे रा जलालपूर
9.आकाश सुनील मांडगे रा रेहेकूरी
10.महेश अरुण गोडसे रा जोगेश्वरी वाडी
11.गंगाराम सर्जेराव आडगळे रा रवळगाव
या अकरा जनावरं अवैध दारू विक्री करत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 155870- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख, तुळशीराम सातपुते, प्रल्हाद लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे म पो कॉ कोमल गोफने, म पो ना जयश्री गायकवाड यांनी केली आहे.


