कर्जत (स्मार्ट कर्जत न्यूज नेटवर्क) :  श्री लगड एम एस आज 30/4/2021 रोजी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. प्रथम त्यांना, त्यांनी केलेल्या सेवेबद्दल  अभिनंदन व सेवाभावी दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा .

यांच्या बद्दल थोडसं.....

        लगड सरांचा जन्म पांढरेवाडी येथे झाला, त्यावेळची पांढरेवाडी ही आत्ताच्या पांढरेवाडीपेक्षा खूपच दुष्काळी होती, पण एकमेकांमध्ये प्रेमाची भावना ,तसेच शब्दांना मानणारे व शब्दाला जागणारे लोक या वाडीत राहत होते . त्यापैकी  आमचे आजोबा कै. शंकरराव लगड (दादा ) व आमच्या आजी (काकू)  . यावेळी त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन एक डॉक्टर तर दोघांना रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक  व एका मुलास उत्तम शेती करण्यास लावले.

 हे आपले लगड सर सर्वात लहान असल्याने घरातील लोक त्यांना लाडाने लालू म्हणत ,सर्व भाचे मच्छू  मामा म्हणत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पांढरेवाडीत झाले तर माध्यमिक शिक्षण श्री कोळाईदेवी विद्यालयात झाले व पुढील शिक्षण न्यू आर्ट्स कॉलेज नगर या ठिकाणी झाले. कॉलेज जीवनातील सुट्टीच्या काळात त्यांनी आपला वेळ कधीच वाया घातला नाही. नांगरणी करताना, विहिरीचे काम करताना मी त्यांना पाहिले आहे. पूर्वी लग्नानंतर वधू-वराची वरात काढली जात असे ,सर्व वाडीतील मुले, वयस्कर लोक लेझिम खेळत असत त्यात आपले मच्छू  मामा तेही खेळत असे आमचे मच्छू मामा लुंगी लावलेले आणि वरती बनियन पण बनियन ओलेचिंब होईपर्यंत लेझीम खेळत तर कधी ढोल-ताशांच्या तालावर डान्स करत. त्यांचे राहणीमान पूर्वी पासूनच अतिशय टापटीप असायचे 

         लगड सर नववी मध्ये असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये श्री डुबल काका यांच्या वैरणीस आग लागली होती , त्या वेळी नववीच्या वर्गातील मुलांनी प्रथम खिडकीतून ते पाहिले व सर्व मुलांनी शाळेतील बादल्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये आमचे लगड सर पुढे होते तेव्हा पासूनच त्यांच्या मध्ये धाडसी वृत्ती होती.

               लगड सर आज दिसत आहेत तसे ते वयाच्या  ३५ वर्षापर्यंत नव्हते सडपातळ बांधा पण सर्व गुण संपन्न असे होते. प्रथम काही दिवस त्यांना पिंपळगाव पिसा येथील विद्यालयात नोकरी केली आणि नंतर रयत मध्ये आले प्रथम काष्टी , श्रीगोंदा आणि शेवटी कोळगाव या तीनच  विद्यालयात त्यांची सेवा झाली, पण परिसाचा स्पर्श जसा लोखंडाला होतो आणि त्या लोखंडाचे सोने व्हावे, तसे  तीनही विद्यालयात काम करताना  विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाकडे  तर लक्ष दिलेच पण  त्या विद्यालयाच्या भौतिक सुविधा ही पहिल्या कोळगाव मध्ये तर त्या कामाची सीमा ओलांडली  अशा प्रकारे या तीनही विद्यालयाचे त्यांच्या कामामुळे सोने झाले.

           संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा सर्वत्र उमटवला  मग ती माध्यमिक तालुका  शिक्षण संघटना असो,  अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटना असो किंवा मुख्याध्यापक महाराष्ट्र महामंडळ असो.

              हे करत असताना नातेवाईकांच्या सुख-दुःखात नियमित सहभागी होणारे लगड सर ,अशा या लगड सरांना एक दिवस कोळगाव चे सरपंच म्हणून पाहण्यास माझ्यासारख्या भाच्याला निश्चित संधी मिळावी अशी मी आई कोळाईदेवी चरणी प्रार्थना करतो.

- भोयटे सुरेश बापूसाहेब

उपशिक्षक, सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर कर्जत