कर्जत (प्रतिनिधी ): कर्जत तालुक्यातील मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणा दरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धत वापरण्याची विनंती विशाल विरपाटील यांनी वैद्यकीय अधिकारी दराडे यांच्याकडे केली.  दि. 26 एप्रिल रोजी 160 लस मिरजगांव केंद्रात होत्या पण 250 ते 300 नागरिक लस घेण्यासाठी आले होते अणि या ठिकाणी गर्दी होऊन नागरिकांन मध्ये नंबर वरून  वादविवाद होत होते यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकरण करताना बरीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिक अणि आरोग्य कर्मचारी यांची गैरसोय होणार नाही यासाठी काही करता येईल का या साठी आज डॉक्टर दराडे वैद्यकीय अधिकारी, मिरजगांव यांच्याशी विरपाटील यांनी चर्चा केली त्यामध्ये काल सारखी लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये अणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून टोकन पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो असे सुचवले जेणेकरून ज्या नागरिकांनी टोकन घेतले आहे तेच नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या परिसरात थांबतील अणि सर्वात महत्वाचे म्हणजे टोकन पद्धतीमुळे नागरिकांमध्ये नंबर वरून वादविवाद ही होणार नाही अणि जेवढ्या लस आहे तेवढेच नागरिक टोकन घेतल्यामुळे तिथे असतील यामुळे दिवस भर रांगेत उभे राहून अचानक लस संपली हे ऐकून निराश होऊन माघारी जाण्याची वेळ कोणत्याही नागरिकांवर येणार नाही असे मत वक्त केले. लसीकरण केंद्रावर  गर्दी होऊ नये अणि नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी जे जे करता येईल ते आपण करू असे वैद्यकीय अधिकारी दराडे यांनी सांगितले.