मिरजगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तसेच अहमदनगर जिल्हात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर मिरजगांव येथील नवयुग प्रतिष्ठान व आनंद सुशील जैन युवा मंच यांच्या वतीने व उद्योजक श्री. जितेंद्र उर्फ बापूशेठ कासवा व मा. जि.प. सदस्य परमवीर पांडुळे यांच्या विशेष सहकार्याने आज दि. ३० एप्रिल २०२१ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला १२ ते ३या या वेळेत ५१ जणांनी यात सहभाग नोंदवून रक्तदान केले.
जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी रक्तसंकलन केले.यावेळी रक्तदान केलेल्या प्रत्येकाला स्व.कोंडाबाई कासवा चारिटेबल ट्रस्ट यांच्या कडून भेट म्हणून वाफ घेण्याचे मशीन व सॅनिटाइझर देण्यात आले.शिबीर यशस्वीतेसाठी नवयुग प्रतिष्ठान, आनंद सुशील जैन युवा मंच व मिरजगांव येथील ग्रामस्थ व व्यापारी आदींनी सहकार्य केले.


