कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरात टायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करत कर्जत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांच्या टायर सह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जोहिन सलीम सय्यद रा. कुंभार गल्ली कर्जत यांचे कर्जत राशीन रोडवर कर्जत येथे बहार नावाचे टायर पंचर दुकान असून दुकानात ट्रकचे जुने 25 टायर कंपनी रिप्लेसमेंट करिता जमा करून ठेवले होते. ते टायर पंक्चर चे दुकान बंद करून रात्री घरी गेले असता ठेवलेले टायर अंधाराचा फायदा घेऊन दिनांक 23/4/2021 ते 24/4/2021 रोजी च्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत, अशी फिर्याद दाखल कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन सी सी टी व्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील गेलामाल आरोपीचा शोध घेत असताना सदर चे आरोपी राशिन येथील असल्याचे समजले. सविस्तर माहिती घेऊन राशीन येथील एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले -
1) महेश दिपक माने, जगदंबा मंदिरामागे, राशीन
2) विशाल गंगा जाधव, जुना बैल बाजार, राशीन
3) अभिषेक उर्फ बबलू विजय घोडके, वसंत गल्ली, राशीन
4) अविनाश गणपत भाले, गारुड गल्ली, राशीन
5) राहुल संतोष उफाडे, सरकारी दवाखाण्याजवळ, राशीन, ता. कर्जत
6) एक अल्पवयीन, रा. राशीन, यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती आणि जितो अशी 2 चारचाकी वाहने हस्तगत केली. गुन्ह्यातील गेला माल एकूण 25 टायर हस्तगत केले आहेत. असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला असुन 5 आरोपींना अटक करून माननीय कर्जत न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी 2 दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशन चे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनी सुरेश माने, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम , शाहूराज तिकटे, यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महादेव गाडे हे करत आहेत.


