पी. पी. ई. किट व मास्क चे वाटप करताना उद्योजक मेघराज बजाज , वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, डॉ. अंजुम सय्यद , व इतर मान्यवर .
कर्जत (स्मार्ट कर्जत वृत्तसेवा) : कर्जत तालुक्यातील राशीन येथे कोरोना ची साखळी वाढत चालली आहे . कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासकीय स्तरावरून पावले उचलली जात आहेत .रुग्णांच्या मदतीसाठी कोव्हीड सेंटर चालू झाले आहेत . राशीन येथील आरोग्य केंद्रत दोन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्याचा भार सांभाळत आहेत . राशीन चे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप व्हरकटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणवत होत्या . त्यामध्ये कर्मचाऱ्यांना लागणारे पी. पी. ई. किट , एन नाईंटी फाईव्ह मास्क , सैनी टायझर , हॅन्ड ग्लोज याची कमतरता भासत आहे .त्यासाठी राशीनमधील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन केले होते . या आव्हानाला प्रतिसाद देत राशीन येथील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे, माणूसकिची पताका खांद्यावर घेऊन उद्योजक मेघराज बजाज यांनी राशीनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास तात्काळ शंभर पी. पी. ई. किट , 100 मास्क चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलिप व्हरकटे यांच्या कडे सुपूर्त केले. बजाज यांच्या मदतीच्या हात पुढे आल्यामुळे कर्मचाऱ्यांना व रुग्णांना दिलासा मिळाला आहे .त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल त्याचे कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे , तहसीलदार नानासाहेब आगळे , गटविकास अधिकारी अमोल जाधव , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप पुंड यांनी अभिनंदन केले आहे . यावेळी वासुदेव फर्निचर चे संचालक उदयोजक मेघराज बजाज म्हणाले की, सध्या फक्त आरोग्याचे मंदिर उघडे आहेत . या मंदिरांना मदत करा नक्कीच त्याचे चांगले फळ मिळेल अशी प्रतिक्रिया दिली . यावेळी राजू साखरे , सतिष दानवले , कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दै. पुढारी चे प्रतिनिधी प्रा. किशोर कांबळे , दुतीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजूम सय्यद , वसीम हसमी , विलास गरजे, विशाल भैसडे, कांता सोनवणे , मोमिन यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच दूरसंचार अधिकारी लिंबाजी साळवे यांनी सॅनीटायझरचे वाटप केले .


