कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील चांदे येथील हॉटेल शिदोरी याठिकाणी पोलिसांनी कारवाई करत देशी विदेशी कंपनीची दारू जप्त केली आहे. 20/4/2020 रोजी रात्री 08:00 वा ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर अंकुश जाधव नेमणूक कर्जत पोलीस स्टेशन यांचे फिर्यादी वरून आरोपी महादेव लक्ष्मण नवले वय 55 वर्षे राहणार चांदा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 5144.50 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा माल यावेळी जप्त करण्यात आला.
हॉटेल शिदोरी या ठिकाणी आरोपी महादेव लक्ष्मण नवले हा स्वताच्या फायदा करिता विना परवाना बेकायदा देशी विदेशी दारू स्वताच्या कब्जात बाळगताना मिळून आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील माळशिकरे हे करत आहेत.


