कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिस स्टेशन हद्दीतील चांदे खुर्द ता. कर्जत जिल्हा अहमदनगर,गावातील गायरानाला शनिवार 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आग लागली होती,हे कळताच चांदे खुर्द गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास सूर्यवंशी यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावल्यामुळे उर्वरित 400 एकर गायरान आणि आजूबाजूला असलेले शेतकरी बांधवांचे जनावरांचे गोठे व चारा वाचविण्यासाठी व गायरानाला लागलेली आग विझवण्यात यश आले.
रामदास सूर्यवंशी यांनी सांगितले की चांदे खुर्द येथे दुपारी 12-30च्या दरम्यान गावाच्या पुर्व बाजूस खराड्याच्या माळाला आग लागल्याबाबत स्थानीक शेतकरी संदीप कुरूमकर यांनी मला काँल केला त्यानुसार मी ग्रामसुरक्षा हेल्पलाइनला काँल केला व मँसेज करुन सांगितले की चांदे खुर्द येथून रामदास सूर्यवंशी बोलतोय खराड्याच्या माळाला गंभीर स्वरुपाची आग लागली आहे तरी आग विझविण्यासाठी सर्वांनी येऊन सहकार्य करावे...हा मँसेज काही मिनिटांत सर्व लोकांपर्यत फोनद्वारे गेला व साधारणपणे 50-60 जण आग विझविण्यासाठी 5-10मिनीटात घटनास्थळी हजर झाले व मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.या आगीमध्ये साधारण 60-70एकर क्षेत्र जळाले आहे. आग ही तेथील शेतकरी यांनी बांध पेटविल्यामुळे लागली होती..
ग्राम सुरक्षा हेल्पलाईन मुळे गावातील 500-600एकर क्षेत्र जळण्यापासून वाचले आहे.


