
कर्जत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील घरफोडीतील सोने आणी रोख रक्कम असा 10 लाख रु चा माल जप्त करण्यात आला असून कर्जत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार विठ्ठल शाम दसपुते, रा. बुवासाहेबनगर, कर्जत, ता. कर्जत जि.अहमदनगर हे त्यांचे घर दि. 10/05/2021 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास बुवासाहेब नगर कर्जत ता. कर्जत येथील राहते घर लॉक करून गेले असता 10.00 ते 12.30 वा. त्यानंतर घरी आल्यावर कोणीतरी घराचे कुलूप उघडुन घरातील सामानाची उचका पाचक केली असल्याचे लक्षात आले. अधिक पाहिले असता घरात ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली नाही. अनोळखी चोरट्याने फिर्यादीचे घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले होते त्याचे वर्णन खालीलप्रमाणे-
1) 4,00,000/- रु. कि. सोन्याचे आठ तोळा वजनाचे जु. वा. किं. अं.
2) 1,30,000/- रु. कि. चे सोन्याचे नेकलेस अडिच तोळा वजनाचे जु. वा. किं. अं
3) 1,30,000/- रु. कि. च्या सोन्याची चैनी अडिच तोळा वजनाच्या जु. वा. कि. अं.
4) 1,00,000/- रु. कि. चे सोन्याचे कानातील तीन जोड दोन तोळे वजनाचे जु. वा. किं. अं. 5. 25,000/- रु. कि. ची अर्धा एक सोन्याची अंगठी अर्धा तोळा वजनाची जु. वा. किं. अं.
5) 10,000/- रु. कि. ची सोन्याची नथ दोन ग्रॅम वजनाची जु. वा. किं. ओ.
7) 2,10,000/- रुपये रोख रक्कम स्यामध्ये 2000, 500, 200, 100, 50 रुपये दराच्या नोटा
एकुण 10,05,000/- रुपये
येणेप्रमाणे वरील वर्णनाचे व किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अनोळखी चोरट्याने चोरुन नेले आहेत.
या तक्रारी वरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा कर्जत पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि जवान यांनी सलग 24 तास तपास करून गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चोरी बाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी गेलेल्या मालापैकी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 9,84,000 रु चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाट, किरण साळुंखे, पोलीस जवान हिंगडे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, सुनिल खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र घुंगसे, प्रकाश वाघ, रोहित यामुळ, चंद्रकांत कुसाळकर, अमित बर्डे, सुनील वारे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, अमित बर्डे करत आहेत.


