कर्जत (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या व कार्यरत असलेल्या 'ग्रामसंवाद सरपंच संघ' महाराष्ट्र राज्य संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री सतीश सुरेश भुई यांची बिनविरोध निवड करण्यात आली पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व ओबीसी फाउंडेशन चे युवा जिल्हाध्यक्ष सतीश भुई यांनी पिराची कुरोली पंचक्रोशी मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुण युवकांचे संघटन केले आहे, त्यांचा सुसंस्कृत स्वभाव काम करण्याची पद्धत अडचणीत असलेल्या लोकांना मदतीला धावून जाणे तसेच बचत गटाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी दूर करणे, त्यांनी अल्पावधीतच केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना ग्रामपंचायत मध्ये राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असा हा सामाजिक कार्यकर्ता असल्याची समाजामध्ये ओळख असल्याने गावात केलेल्या कार्याची दखल घेत "ग्राम संवाद सरपंच संघ" महाराष्ट्र राज्य, प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्र ग्राम संवाद सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली,. यावेळी सतीश भुई म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व सरपंच ,उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन करून "ग्राम संवाद सरपंच संघ" वाढवण्या करता व बळकटी येण्याकरता समाजातील सर्व लहान मोठ्या वंचित तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोचून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तसेच योग्य न्याय व हक्क मिळवून देणे करता नेहमीच प्रयत्नशील असेल गावात वेगवेगळ्या समाज उपयोगी योजना आणून विकास करण्याचा प्रयत्न करीन, त्यांच्या निवडीबद्दल माढा मतदार संघाचे आमदार माननीय बबन दादा शिंदे, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ दादा भालके, माजी जिल्हा परिषद सभापती संजय पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर लामकाने, माजी संचालक पंढरीनाथ लामकाने, संचालक बाळासाहेब कौलगे, फिषेरमन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भुई, सरपंच शेख ,उपसरपंच रंजीत लामकाने , बाळासाहेब लामकाने पाटील , काकासाहेब आखाडे, दिपक निकम, बंडू भुई, माणिक भुई,अनिल भुई, विलास भुई,अजय भुई, अबासो लामकाने, महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ, जय भवानी जय गणेश मंडळ , सदस्य अनिल लामकाने , कुलदीप कौलगे, विकास रामगुडे, ग्रामसेवक भोसले साहेब सोनुले ऑसम अनिल सोनवले, गजाननभुई, पांडुरंग भुई, तानाजी भुई, गणेश लामकाने तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे..



