
कर्जत (प्रतिनिधी) : दि. 11/05/2021 रोजी उप जिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हिड सेंटर येथे 2 इसम कोरोना पेशंटच्या जवळ गेले. काहीतरी बोलण्याचा बहाणा करून गुपचूप त्या पेशंटचा मोबाईल त्यांनी उचलून निघून गेले. दरम्यान पेशंटच्या लक्ष्यात आले की मोबाईल नाही. म्हणून त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि सदर ठिकाणी हजर पोलीस याना सदरचा प्रकार सांगून त्या इसमांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता चोरी केलेला मोबाईल त्यांच्याकडे मिळून आला. त्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा गु र न 290/2021 ipc 379, 511,34 प्रमाणे दाखल करून आरोपीने अटक करण्यात आली आहे.
आरोपी 1. मोहन भापचंद साबळे, रा. भांडेवाडी, कर्जत
2. रमेश राजेंद्र माने, रा. सहकारी बँकेच्या मागे कर्जत
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, किरण साळुंखे, पोलीस अंमलदार महादेव गाडे, अस्मिता शेळके, शाहूराज टिकते, नितीन नरुटे, होमगार्ड आरिफ पठाण, शंकर निकत यांनी केली.

