कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील लोखरा ओढ्यावर अहमदनगर जिल्हा परीषद यांचे निधीतुन सर्व्हे नं. २१६ येथे १५ लक्ष रु. खर्चाचे कोल्हापूर पद्धतीचा साठवण बंधारा कामाचे भुमीपुजन ज्येष्ठ नागरिक व माजी उपसरपंच श्री . बळवंतराव जामदार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अशोक पवार, दत्तात्रय जामदार, निलेश पवार आदी उपस्थित होते. सदर विकासकामामुळे भुजल पातळी वाढुन शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे .  बंधाऱ्याचा विहिरी , कूपनलिका यांना फायदा होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडुन आनंद व्यक्त करण्यात आला.