कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण 7 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती कर्जत तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील 18 ते 44 या वयाच्या नागरिकांनी cowin.gov.in या वेबसाईट वर जाऊन Karjat SDH सेशन्स दिसल्यावर दिनांक 7 मे आणि त्यानंतर च्या Covaccine लसीकरणासाठी नोंदणी करायची आहे असे कर्जत तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


