● कोरोना उपचारासाठी अत्यावश्यक 2300 रुपयांच्या D-डायमर आणि सिरम फेरीटीन चाचण्या होणार फक्त 1200 रुपयात.

● कर्जत मधील सर्व 10 पॅथॉलॉजि लॅबोरेटरी चालकांचा सामाजिक बांधिलकी जपत मोठा प्रतिसाद.

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील गंभीर असलेले कोरोना पेशंट उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचार घेत आहेत. काही रुग्णाचा मृत्यू ओढवत आहे. सदर पेशंट वर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार होण्यासाठी प्रयत्न म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस जवान मनोज लातूरकर आणि बळीराम काकडे यांना सांगून कर्जत शहरातील 10 रक्ताच्या चाचण्या करणाऱ्या पॅथॉलॉजि लॅब च्या चालकांना बोलावून मिटिंग घेतली आणि त्यांचे सोबत चर्चा करून अतिशय गरीब अतिसामान्य लोक उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचार घेत असतात, ज्यांच्याकडे पैसा आहे. ते नागरिक खाजगी दवाखान्यात उपचार घेतात. त्यांना त्यांच्या चाचण्या व खर्च ही त्यांना परवडतो. परंतु अतिशय गरीब नागरिक हे सरकारी दवाखान्यात उपचार घेत असून त्यांना चाचण्यांचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या दोन चाचण्या आहेत. त्यांचे परीक्षण सरकारी रुग्णालय कर्जत येथे होत नाही. अशा डी डायमर व सिरम फेरीटीन या चाचण्या करण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता आणि सदरची मदत एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करावी असे आवाहन केले. त्यावरून लॅबरोटरी चालवणारे चालक यांनी 2300 रुपये किमतीची 1200 रुपयांमध्ये च करण्याचे लगेचच मान्य केले व आम्हाला सुद्धा याद्वारे सामाजिक काम करता येत असल्याचा आनंदच असल्याचे सांगितले.

काल रोजी काही पेशंटच्या चाचण्या सुद्धा करण्यात आल्या. 

डी डायमर व सिरम फेरीटीन चाचण्या कोरोना आजारात पेशंट साठी खूप महत्त्वाच्या आहेत. या चाचण्यांच्या रिपोर्ट वरून त्यांच्या शरीरात हानिकारक घटक किती प्रमाणात जमा झाले आहेत. रक्त किती प्रमाणात घट्ट होऊ शकते अगर कसे- याची माहिती मिळाल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे अधिक सोपे जाते. करिता उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील नागरिकांना व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वरील नमूद चाचण्या या खालील नमूद प्रयोगशाळेत ठरल्याप्रमाणे याप्रमाणे कमी पैशात करून घ्या घ्याव्यात.


1)ओम लॅब, संतोष बालगुडे,

9423465103, 7841986928, 7385465103


2)साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅब, दादा पाचारणे, 7507709481


3)निदान लॅब, नंदलाल काळदाते, 9423389476


4)सुरवरे लॅब, परबत सुरवसे, 9423461345,


5)सार्थक क्लिनिकल लॅब, युवराज शिंदे, 9021637555


6)स्वरा लॅब, राहुल शेळके, 8007424148


7)श्री गणेश लॅब, सतीश तनपुरे, 9420637001


8)समर्थ लॅब, मनोज वाघमारे, 9421334051


9)सद्गुरू लॅब, अजय लांडघुले, 9975634663


10)कार्तिक क्लिनिकल लॅब, रामकृष्ण तापकीर, 9561109451


कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती दिली.