कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील गणेश वाडी शिवारात भीमा नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशावर कर्जत पोलिसांनी कारवाई करत 2400000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. दिनांक 24 मे रोजी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, गणेशवाडी, ता. कर्जत गावच्या शिवारात भीमा नदी पात्रात भरत बलभीम अमनर, दत्तत्रे विक्रम खताळ, अंकुश बाप्पू ठोंबरे हे तांत्रिक बोटीच्या च्या साह्याने चोरून वाळू उपसा करत आहेत. अशी माहिती मिळाल्याने लगेच पोसई/ शिरसाठ यांना बोलावून सदर ठिकाणी जाऊन कारवाई करा असे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक शिरसाट यांनी स्टाफ सह गणेश वाडी तालुका कर्जत या ठिकाणी जाऊन खात्री केली असता भीमा नदी पात्रात तीन यांत्रिक बोटी शिक्षण च्या साह्याने वाळू उपसा करताना मिळून आल्या. सदर बोटी ताब्यात घेऊन त्यावरील दोन लोकांना जागीच पडून त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1. लहू बबलू शेख, रा. पिअरपूर, झारखंड, 2. शौकत बच्चू शेख, रा. पळसगच्ची, झारखंड असे सांगितले. सदर बोटींच्या मालका बाबत विचारपूस केली असता. त्यांनी त्याचे नाव 3. भरत बलभीम अमनर, रा. वाटलुज, ता. दौंड, जिल्हा पुणे, 4. शरद शेंडगे राहणार वाटलुज, तालुका दौंड, जिल्हा पुणे, 5.दत्तात्रय विक्रम खताळ, राहणार गणेशवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर व 6.अंकुश ठोंबरे राहणार गणेशवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. सदर आरोपी वर कर्जत पोलीस स्टेशन गुरन 322/2021, भादवी 379, 34 व पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये एकूण 15,00,000/- किमती 43 यांत्रिक लोखंडी फायबर बोटी व 9,00,000/- रुपये किमतीच्या तीन सेक्शन बोट असा एकूण 24,00,000 रु चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम सातपुते, मारुती काळे, सुनील खैरे, सागर म्हेत्रे, मनोज लातूरकर, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे यांनी केली.


