फक्त दुसरा डोस साठी
गुरूवार दिनांक 27/05/2021
ज्या लाभार्थ्यांना कोवॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ ते ४२ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी कोवॅक्सिन चा दुसरा डोस घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात(उपजिल्हा रुग्णालय, कर्जत) येथे 120 डोस आलेले आहेत, तरी 20 डोस हे फ्रंटलाईन वर्कर्स करिता राखून ठेवण्यात आलेले आहेत.उर्वरित 100 डोस बाकीच्या सिटीझन साठी टोकन सिस्टीम पद्धतीने प्रथम डोस घेतल्यापासून सर्वात जास्त कालावधी होऊन गेलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल. व अशा व्यक्तीपासून टोकन वाटपास सुरुवात करून त्यापुढील 100 लोकांना टोकन दिले जाईल.या करिता कोणीही लसीकरण ठिकाणी पहाटे येऊन रांगा लावू नये. उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील मैदानात ठीक 8 वाजता टोकन वाटप करिता उपस्थित राहावे.टोकन प्राप्त व्यक्तींना सकाळी ९ पासून लसिकरण सुरू होईल.
तसेच जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत 18 ते 44 ही ऑनलाइन सिस्टीम बंद राहणार आहे. त्यामुळे ज्याचा पहिला डोस आहे त्यांनी येऊ नये.


