कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील भोसे येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ , दमदाटी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 19/5/2021 रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आरोग्यसेविका वय 37 वर्ष, रा. होले मळा, श्रीगोंदा, ता श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आरोग्यसेविका दिनांक 19/5/2021 रोजी सकाळी 10.30 वाजनेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भोसे येथे सार्वजनिक कार्य पार पाडीत असताना आरोपी महेंद्र तुकाराम चव्हाण, रा. भोसे, ता. कर्जत याने उपकेंद्राच्या आवारात आरोग्य विभागाच्या नावे आणि फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणून मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला फिर्यादी यांना तसेच डॉक्टर सय्यद यांना घरी बसवितो, तुमच्यावर खोट्या नाट्या केस करतो. असे म्हणल्याने महेंद्र तुकाराम चव्हाण, याचेविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गु र न 312/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार माळशिखरे व पोलीस नाईक यमगर हे करीत आहेत.
आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी याना पोलीस स्टेशन तसेच अधिकारी यांचे नंबर दिले आहेत. त्यांना कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार करावी.


