कर्जत (प्रतिनिधी) : महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या आरोपविरुद्ध कर्जत पोलिसांनी 48 तासात केले दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
दिनांक 2/5/2021 रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे कर्जत तालुक्यातील महिला तक्रारदार यांनी  दिनांक 2/5/2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजनेच्या सुमारास  राहते घरासमोरील पडवीत स्वयंपाक करीत असताना त्यावेळी तेथे नंदेश आप्पासाहेब केंदळे, राहणार ता. कर्जत हा मोबाईल चार्जिंग करण्याचे बहाण्याने आला व फिर्यादी यांची छेडछाड करू लागला, त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता आरोपी नंदेश केंदळे याने फिर्यादी यांना  घाणघाण शिवीगाळ करीत तलवारीने मारून टाकीन अशी धमकी दिली वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन गु र नं 277/2021 भा द वि कलम 354,354(अ) 504,506 प्रमाणे दाखल करण्यात आला होता व तपास पोलिस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत होते 
      सदर गुन्हयातील आरोपी नंदेश आप्पासाहेब केंदळे हा गुन्हा केल्या दिवशी गावातून पसार झाला होता त्यास गोपनीय माहिती काढून पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव सो यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते पो कॉ गणेश भागडे,पो कॉ सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे यांनी दूर गाव शिवारातून पाठलाग करून शिताफीने अटक करण्यात आली आहे व सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र अवघ्या 48 तासात मा प्रथम वर्गन्यायदंधिकारी कर्जत यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले असून फिर्यादिस लवकरात लवकर न्याय देण्यासाठी यशस्वी प्रयत्न कर्जत पोलिसांनी केला असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णा साहेब जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री चंद्र शेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,भाऊसाहेब काळे,गणेश ठोंबरे यांनी केली आहे.