तोंडाची स्वच्छता राखणे

कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची तोंडात वाढ होते. यामुळे सायनस, फुफ्फुसात आणि मेंदूमध्येही समस्या उद्भवतात. दिवसातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ब्रश करुन तोंडाची काळजी घेतल्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया नियंत्रित करत येऊ शकतात. तोंडाची स्वच्छता करणे देखील खूप उपयुक्त असल्याचा सल्ला दिला जातो.

ओरल रायजिंग

कोविड-19 पासून बरे झाल्यानंतर या रोगाच्या दुष्परिणामांपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी तोंडाचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. जुन्या ब्रशवरील विषाणू पुन्हा हल्ला करू नये म्हणून रूग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्यावर टूथब्रश बदलण्याचा सल्ला देण्यात येतो. काळ्या बुरशीसह कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी आपले तोंड नियमितपणे धुण्याचा सल्ला दिला जातो.

◆ टूथब्रश आणि टंग क्लीनर निर्जंतुक करा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमित रूग्ण किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले टूथब्रश कुटुंबातील अन्य सदस्य ठेवत असलेल्याच जागी ठेवू नये. यामुळे इतरांमध्ये विषाणू पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अँटीसेप्टिक माउथवॉश वापरुन, ब्रश आणि टंग क्लिनर वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो.