कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे कर्जत तालुका प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. दि 19 मे रोजी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव असे मिरजगाव शहरात अचानक जाऊन मिरजगाव शहरातील विनापरवानगी सुरू असलेले आस्थापनेवर कारवाई केली. या कारवाई मध्ये 8 केसेस करून त्यांच्या कडून 14600 रु. दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मिरजगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्या तेवीस लोकांची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली, त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव आला आहे. 

तसेच मिरजगाव शहरातील नागरिकांना पेट्रोलिंग करून माननीय जिल्हाधिकारी व कोरोना विषाणू संदर्भातल्या प्रशासनाच्या वतीने P.A. सिस्टीम द्वारे देण्यात आल्या.