कर्जत (प्रतिनिधी) :  मागील पाच दिवसापासून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक भगवान शिरसाट व राशिन पोलीस दूरक्षेत्र येथील पोलीस जवान यांनी राशीन व परिसरात कोरोना चा फैलाव थोडा जास्त प्रमाणात असल्याने कारवाई केली. भाजीपाल व फळ विक्रेते यांनी एका जागेवर न बसता 07/00 वा ते 11/00 वा पर्यंत गावात फिरून भाजीपाला व फळे विकणे बाबत सूचना केल्या. राशीन शहरातील वेगवेगळ्या चौकात नाकाबंदी करून तसेच शहरात व परिसरात पेट्रोलिंग करून विनाकारण फिरणारे तसेच आदेशाचा भंग करून लपुन दुकान सुरू ठेवणारे यांच्यावर कारवाई केली. त्यामध्ये डबल सिट, विना मास्क व मा. जिल्हाधिकारी सो. अहमदनगर यांच्या आदेश चे उल्लंघन केल्या बद्दल 268 कारवाई करून 52400/- रुपये दंड करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट व पोलिस जवान पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम सातपुते, मारुती  काळे पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे यांनी केली आहे.