कर्जत (प्रतिनिधी) : समाजाच्या संरक्षणासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हे सतत सतर्क असतात , सततचे जागरण, वेळेवर न जेवण, सतत असणारा हा कामाचा तणाव, लोकांच्या अपेक्षाचे ओझे अशा अनेक बाबी मुळे समाजातील पोलीस व पत्रकार या दोन महत्वाच्या घटकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे असते मात्र कामाच्या ओघात त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही व यातून अचानक एखाद्याला व्याधी पुढे उद्भवल्यास  खूप उशीर झालेला असतो, समाजातील पोलीस व पत्रकार या दोन घटकांकडे समाजाचे म्हणावे असे लक्ष नसल्यानेच याबाबत विशेष काळजी घेत कर्जत पोलिस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून पोलीस व पत्रकार यांची कुटुंबियासह विविध तपासण्या करण्याचे आयोजन करण्यात आले, सदर तपासण्या साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅबोरेटरीचे संचालक दादा पाचारणे आणि त्यांचे मदतनीस अरविंद झांबरे, महेश झांबरे यांनी केल्या. कोणतेही उद्घाटन नाही, मान्यवर नाही तर थेट काम अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमात प्रथम महिलांची तपासनी करून सुरुवात झाली, यावेळी अनेक पोलीस व पत्रकार यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.  शेवटी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांनी पोलीस निरीक्षक यादव व साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅबोरेटरीचे संचालक दादा पाचारणे याचे पोलीस व पत्रकारांच्या वतीने  आभार मानले.