कर्जत (प्रतिनिधी) : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सदाशिव संभाजी आटोळे वय 55 वर्ष धंदा नोकरी राहणार खातगाव तालुका कर्जत यांचे फिर्यादीवरून अब्बास बादशहा मोगल राहणार दुरगाव, तालुका कर्जत यांचेवर गुरन 260/2021 भादवि कलम 353,332,504,506  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिनांक 26/04/2021 रोजी सकाळी 10/00 वा चे सुमारास दुरगाव तालुका कर्जत या ठिकाणी आरोपी  अब्बास बादशहा मोगल याने ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सदाशिव संभाजी आटोळे हा सरकारी काम करीत असताना तेथे आला व मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादीस ग्रामपंचायतीची पाणी येत नाही म्हणून शिवीगाळ केली तेव्हा सदाशिव संभाजी आटोळे त्यास समजावून सांगत असताना अब्बास बादशहा मोगल याने सदाशिव संभाजी आटोळे यांचे  पुढे असलेले सरकारी कामकाजाची दप्तर अस्ताव्यस्त फेकून दिले व कॉम्प्युटर ऑपरेटर शब्बीर बाबासाहेब शेख हा चालवीत असलेल्या कम्प्युटर च्या वायरी काढून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कसे काम करतात हेच पाहतो अशी धमकी देऊन सरकारी कामात हरकत अडथळा आणला आहे अश्या मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.