कर्जत (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मिरजगाव अंतर्गत भूमी,जल,अग्नी,वायू,आकाश, या घटकांतर्गत विविध अधिकारी व कर्मचारी यांनी व्हिडिओ द्वारे प्रेझेंटेशन सादर केले. छतावरील पाणी संवर्धन व सौर दिवे कामकाज बाबत महसूल मंडळ अधिकारी मोहसिन शेख, वृक्षारोपणाबाबत विस्तार अधिकारी विश्वास तनपुरे ,पवार सर,हरित वनबाबत ग्रामसेवक किरण जवणे  ,कंपोस्ट खत निर्मिती ग्राम विकास अधिकारी महादेव गाडेकर,रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड ग्रामसेवक अमित कोल्हे व निलेश बनकर,भाऊसाहेब बंधारा ग्रामपंचायत कर्मचारी अशोक नवले ,दगडी अंगड बंधारा प्राथमिक शिक्षक दीपक करंजकर,रोकडोबा वेस बंधारा कृषि सहायक सचिन कालेकर,कॅनाल सुशोभीकरण घालमे  भाऊसाहेब,समतल चर ग्रामविकास अधिकारी धर्मराज गायकवाड,गावतलाव खोलिकरण ग्रामविकास अधिकारी शरद कवडे  व गणेश विरपाटील,सौर कृषी पंप ग्रामसेवक शेवाळे,बायोगॅस विस्तार अधिकारी मिसाळ साहेब,यांनी  राज्यस्तरीय समिती समोर  प्रेझेंटेशन सादर केले.संपूर्ण प्रेझेंटेशन बाबत प्राथमिक शिक्षक आशिष निंबोरे व  ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे यांनी कामकाज पाहिले.यावेळी प्रत्येक घटकांचे प्रेझेंटेशन करणारे अधिकारी कर्मचारी यांचे सहित गटविकास अधिकारी अमोल जाधव  सर,कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव सर,सहाय्यक गटविकास अधिकारी रुपचंद जगताप सर, सरपंच नितीन खेतमाळस,आबासाहेब विरपाटिल इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रेसेंटेशन यशस्वी करण्यासाठी मिरजगांव ग्रा.प.चे वरिष्ठ कर्मचारी  निशांत घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.