17 लॅब चालक करणार प्रशासनाला मदत, प्रशासनाच्या वतीने करणार टेस्ट.

कर्जत (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिक हे काही त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जातात. त्यांना काय होतंय याची माहिती देतात. तसेच नागरिक काहीतरी आजार किंवा लक्षणे असल्यास पॅथॉलॉजि लॅब मध्ये वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी जातात. जर या सर्व डॉक्टरांना आणि पॅथॉलॉजि लॅब यांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना सदृश्य लक्षणे असलेले नागरिक तात्काळ मिळून येतील आणि त्यांच्या लवकर टेस्ट करून कोरोना असल्यास तात्काळ उपचार करता येतील हा विचार करून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथील 10 आणि राशीन येथील 17 पॅथॉलॉजि लॅब चालकांची कर्जत पोलीस स्टेशन तसेच राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस जवान मनोज लातूरकर, गोवर्धन कदम, गणेश भागडे यांच्या मदतीने मीटिंग बोलावली. त्या मीटिंग मध्ये प्रशासनाचे म्हणणे समजावून सांगितले. जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट केल्यास कसा फायदा होईल, नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी कशी सोय करणे आवश्यक आहे याबाबत चर्चा केली. प्रशासन रॅपिड अँटीजन किट, मास्क आणि हॅन्ड ग्लोवस उपलब्ध करून देतील आपण टेस्ट करा अशा आवाहनवरून हे 17 लॅब चालक विनामूल्य कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार झाले आहेत. सदर बाबत डॉक्टर्स ना सुद्धा आपण पेशंट आला की त्याची लॅब मध्ये सुद्धा कोरोना टेस्ट करू शकता आणि करावी याबाबत आवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक यांनी सर्व लॅब चालक यांचेशी चर्चा करून RAT टेस्ट करण्यासाठीचे किट आणि मास्क प्रांत अर्चना नष्टे, तहसीलदार श्री नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्री अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्री संदीप पुंड यांच्या हस्ते लॅब चालकांना देण्यात आले. या सर्व टेस्टस चा डेटा हा तालुका आरोग्य कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. वेळोवेळी प्रशासनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी टेस्टिंग वेळी उपस्थित राहणार आहेत.

यामुळे कर्जत व राशीन ग्रामस्थांना कोरोना चाचणी करणे सोयीस्कर होणार असून लोकांचा वेळ वाचणार आहे. तसेच गर्दीचे प्रमाण देखील कमी होणार नाही. सदर टेस्टची सर्व माहिती रोजचे रोज प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांवर उपचार करता येणार आहेत आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे सुध्दा करता येणार आहे.
           सदर उपक्रमामुळे तालुक्यात जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होतील व कोरोना संसर्ग हा नियंत्रणात आणण्यास खूप मोठी मदत होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी यापुढे कर्जत येथील 10 लेप चालक व राशीन येथील 7 लॅब मध्ये मोफत रॅपिड एंटीजन चाचणी करून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन आपली कोरणा टेस्ट करून घ्यावी.

कर्जत येथील लॅब-

1)ओम लॅब
संतोष बालगुडे,

2)साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅब, दादा पाचर्णे, 7507709481

3)निदान लॅब, नंदलाल काळदाते, 9423389476

4)सुरवरे लॅब, परबत सुरवसे, 9423461345,

5)सार्थक क्लिनिकल लॅब, युवराज शिंदे, 9021637555

6)स्वरा लॅब, राहुल शेळके, 8007424148

7)श्री गणेश लॅब, सतीश तनपुरे, 9420637001

8)समर्थ लॅब, मनोज वाघमारे, 9421334051

9)सद्गुरू लॅब, अजय लांडघुले, 9975634663

10)कार्तिक क्लिनिकल लॅब, रामकृष्ण तापकीर, 9561109451

राशीन येथील लॅब-

1) श्री साई पॅथॉलॉजीकल लॅब
नवनाथ काळे

2)युनिक लॅब
कविता अंकुश काळे

3)ऋतुजा लॅब
संतोष फरांडे

4)सिद्धिविनायक लॅब
शीतल सतीश काळे

5)श्री जगदंबा लॅब
बाळासाहेब चव्हाण

6)श्री लॅब
अतुल कानगुडे

7)हायटेक लॅब
सय्यद व्ही