कर्जत (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात समाजच आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोना रुग्णांना मदत केली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज कर्जत मधील विज्ञान शाखेच्या 2002 ते 2004 या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही मदत केली असून हे माजी विद्यार्थी सध्या वैद्यकीय, इंजिनिअर,शिक्षण, पोलिस, वकिली, संशोधन, राजकीय, व्यावसायिक व इतर शेत्रात काम करत आहेत.
9 मे कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतथीनिमित्त एकत्र येऊन आवाहन करण्यात आले होते, या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत 9 मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आवाहन केले होते. आवाहनाला साथ देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 9 मे चे पुण्य तिथी चे औचित्य साधून सद्य परिस्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली व मदत जमवण्यासाठी आवाहन केले गेले. त्याला प्रतिसाद देत रू 1,02,551/- रकमेचा झेनॉन कंपनीच्या Feravir 400 च्या 122 स्ट्रिप्स उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे सुपूर्द करण्यात आल्या. या वेळेस कर्जत चे तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, कर्जत नगरपंचायत मुख्याधिकारी श्री गोविंद जाधव , डॉ. बांगर, डॉ. पूजा आंधळे तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वर्ग व महात्मा गांधी जनियर कॉलेज चे माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.


