![]() |
| कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील भीषण पाणी टंचाई व कोरडा चा प्रादुर्भाव यासंबंधी निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देताना चिलवडी चे सरपंच राजू हिरभगत . |
कुकडीचे आवर्तन सोडण्याची चिलवडी चे सरपंच राजू हिरभगत यांची मागणी.
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आवाज कोरडाठाक पडला आहे . सध्या चिलवडी मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे . दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढत चालली आहे . या कठीण काळात कोरोणा शी लढा देत असतानाच भीषण पाणीटंचाईमुळे चिलवडी येथे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे . तरी या भीषण परिस्थितीचा विचार करून शासनाने ताबडतोब कुकडीचे आवर्तन चिलवडी तलावात सोडावे तसेच चिलवडी येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये रॅपिड ॲन्टीजन कीट द्वारे नागरिकांची तपासणी करावी .अशी मागणी चिलवडी चे सरपंच राजू हिरभगत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार नानासाहेब आगळे , व कुकडी चे कार्यकारी अभियंता , प्रांत अधिकारी यांना केली आहे . चिलवडी गाव मध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी कोरोणाच्या भीतीच्या सावटाखाली वणवण भटकावे लागत आहे . तसेच पशु धनाची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे . जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे .तीही कोरडीठाक पडली आहे. तरी भीषण परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने वरील मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, उपसरपंच संजय खैरे , ग्रामपंचायत सदस्य रविंद्र नवले , अशोक लोंढे , मनोहर काळोखे , आप्पा शिंदे , सतीश फरांडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे .



