कर्जत,दि.६ जून(प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील रातंजन येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. रातंजन ग्रामपंचायत येथे भगवा ध्वज फडकवून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा  देण्यात आला.  यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. त्याच दिवशी सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार असल्याचे शासनाने नमूद केलेल्या संहितेत सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी सरपंच बापू काळे , अदिका बांदल, डॉ. श्रीराम धस ,शरद सकट, विलास काळे, पप्पू काळे, राजेंद्र कणसे,  विकास झांबरे, सचिन झांबरे, जयदीप काळे बाळासाहेब जगदाळे, संपत कांबळे, किशोर सकट, सूरज सकट, राजेंद्र बनकर, ग्रामसेवक अमित कोल्हे  आदी उपस्थितीत होते.