कर्जत,दि.७ जून (प्रतिनिधी) : निश्चित वयोमानानुसार शिक्षक ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होतात.मात्र त्यानंतरही सेवानिवृत्त शिक्षकांनी सेवा दिलेल्या संस्थेच्या भौतिक, शैक्षणिक, गुणात्मक,सामाजिक विकासात या शिक्षकांचे निरंतर योगदान मिळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था- आढळगावचे जनरल बाॅडी सदस्य सुभाषलाला गांधी यांनी केले.

    पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स,आढळगाव येथील पर्यवेक्षक श्री लक्ष्‍मण बबन शिंदे यांच्या सेवापुर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.शिंदे यांनी ३४ वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा केल्याबद्दल आढळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.आढळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या बहुमजली इमारत उभारणीत शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे असे गौरोध्दगार मान्यवरांनी व्यक्त केले.

    कोरोनाची परिस्थिती पाहता सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाळेमध्ये न घेता घरगुती घेण्याचा निर्णय शाळेचे मुख्याध्यापक व गावातील प्रमुख व्यक्तींनी घेतला.हा कार्यक्रम घेताना सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय इन्स्पेक्टर कन्हेरकर ,आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, प्राचार्य पंडित घोंगडे, संपत पवार, नवनाथ बोडखे,भारत हिंगसे,माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र नलगे,बबन गव्हाणे, लगड एम एस, व शिक्षक , राजेंद्र खेडकर,राहिंज बी.के.,उत्तम राऊत, देवराव शिंदे, शरद जमदाडे, अंबादास चव्हाण,शरद शिंदे, चंदू काळे आदी मान्यवर उपस्थित होते.