कर्जत, दि. ७ जून (प्रतिनिधी) : दिनांक २७/०५/२०२१ रोजी रात्री २० / १५ वा सुमारास सागर शंकर निंभोरे वय ३० वर्ष रा. घोडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर याने कर्जत पोलीस ठाण्यात दुरगाव फाटा येथे मोटर सायकलला 2 अज्ञात मोटर सायकल वरील इसमानी मोटर सायकल आडवी लावून चाकुचा धाक दाखवुन, मारहाण करून खिशातील १ लाख रुपये व सॅमसंग कंपनिचा मोबाईल हिसकावून घेवुन पळुन गेले आहेत. त्यामध्ये पायाला देखील दुखापत झाल्याचे सांगितले.
तात्काळ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी भेट देवून खात्री करण्यास व आरोपींचा शोध घेण्यास सांगीतले.
पोलीस अधिकारी आणि जवान यांनी सदर ठिकाणी भेट दिली आणि त्याबाबत पोलीस निरीक्षक यांना माहिती सांगितली. एकंदरीत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने आणि पोलीस अंमलदार यांना चर्चेअंती तक्रारी मध्ये संशय वाटू लागला. सदरबाबत निंभोरे याची तक्रार घेऊन सपोनि सुरेश माने यांना तपास करण्याबाबत सूचना दिल्या.
तक्रारदार हा खोटे बोलत असल्याचे त्याचे वर्तनावरुन दिसून येत असल्याने त्याचा पुर्व इतिहास चेक केला असता त्याचेवर खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
१) २०४/२०१५ भादवी कलम ३०२,३९४,३४, श्रीगोंदा पोलीस स्टेशन
२) ३०६/२०१५ भादवी कलम ४२०, ४०६, ४६८, ४७१, ४११,३४ वाळुज पोस्
३) ८३०/२०१९ भादवी कलम ३७९
अर्जदार हा त्याचा मामा गोरख नभाजी दरेकर याने लुटल्याचा संशय असल्याची फिर्याद घ्या असे तो सांगत होता. त्या अनुषंगाने कर्जत पोलिसांनी कसून तपास केला.
कर्जत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की त्याचा आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही लोकांचा वाद झाला होता.
पोलीस अधिकारी आणि जवान अर्जदारास घेवुन घोडेगाव, श्रीगोंदा येथे गेले.सदर तपासामध्ये असे समजले की, तक्रार दार याचा मामा पोपट दरेकर व त्याचा मुलगा दिपक देरकर याचे सोबत वाद झाला आहे. तक्रारदार निभोरे यास घेवुन पोपट दरेकर यांचे घरी गेले असता त्याची मामी सौ नंदाबाई पोपट दरेकर यांनी तक्रारदार निभोरे यांचे समक्ष कळवीले की, दिनांक २५/५/२०२१ रोजी तक्रारदार सागर निभोरे याने तीचा मतीमंद मुलगा दिपक यास मारहान केली असुन त्याचा मोबाईल दिपक दरेकर याने चोरला म्हणुन आमचे घराची सगळीकडे झडती घेतली घराची झडती घेतली. दिपक दरेकर यास मारहाण केल्याची जखम दाखवीली.
आपण जी खोटी तक्रार करतोय ती उघडकीस येतेय हे लक्षात आल्यावर तक्रारदार सांगर निभोरे हा सदर ठिकाणाहून गाडीत बसण्यास सांगितले असता पळून गेला.
तपासा दरम्यान असे लक्षात आले की बँकेतुन काढलेली रक्कम ही नातेवाईकांना दिलेली आहे. निंभोरे चे मामा मामी हे शेतीच्या वाटयाचे पैसे देत नाहीत म्हणून निंभोरे हा मोबाईल त्यांचे घरात ठेवून तक्रार देण्यास पोलीस स्टेशन आला होता.
तक्रारदार सागर शंकर निभोरे रा. घोडगेवा ता. श्रीगोंदा याने बनाव करून खोटी तक्रार करुन त्याचे नातेवाईकांना त्रास होईल अशी व्देष भावना मानात ठेवून पोलीसांना खोटी माहिती देवून खोटा पुरावा तयार केला, तसेच पोलीस यंत्रणेचा वेळ व महाराष्ट्र शासनाची अर्थीक फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून त्याचे विरुध्द पोलीस जवान ईश्वर माने यांचे तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन गुरनं ३४७/२०२१ भादवी ४२०, १८२, १९३. २११.५११, प्रमाणे गुन्हा दाखल कण्यात आला असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर हे करत आहेत.
सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार महादेव गाडे, ईश्वर माने, अमीत बर्डे, श्याम जाधव, नाना दरेकर यांनी केली आहे.


