कर्जत,दि.८ जून (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून तालुक्यातील कर्जत शहरासह माहिजळगाव, टाकली खंडेश्वरी येथील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.उपविभागीय कृषी अधिकारी प्रविणकुमार गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी रुपचंद जगताप यांच्यासह पथकाने तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. दत्त कृषी सेवा केंद्र भांडेवाडी, रेल रिलायबल ॲग्रो सर्व्हिसेस, सद्गुरू सीडस & फर्टीलायझर , भोसले कृषी उद्योग भांडार, पवार कृषी सेवा केंद्र, कृषी सेवा केंद्र, अभिमन्यू कृषी सेवा केंद्र, अंबिका कृषी सेवा केंद्र, शेतकरी कृषी सेवा केंद्र, टाकळी खंडेश्वरी येथील पवार कृषी सेवा केंद्र, माहीजळगाव येथील अजित कृषी सेवा केंद्र, जनसेवा कृषी सेवा केंद्र, जगदंबा कृषी सेवा केंद्र, संत गजानन कृषी सेवा केंद्र, थापलिंग कृषी सेवा केंद्र इत्यादी सेवा केंद्रांची तपासणी भरारी पथकाद्वारे करण्यात आली. तालुक्यात उडीद बियाण्यांची टंचाई नसून शेतकरी उडदाच्या निर्मल या वाणाची मागणी करत आहेत, शेतकऱ्यांनी एकाच वाणाची मागणी करू नये याबद्दल कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणी दरम्यान साठा रजिस्टर अपूर्ण असणे.भाव फलक अदयावत नसणे. उगम प्रमाणपत्र प्रमाणित केलेले नाही. साप्ताहिक/ पाक्षिक अहवाल सादर न करणे , शेतकरी यांचेसाठी टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात नसणे अश्या त्रुटी आढळल्या. त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. साठेबाजी करू नये साठेबाजी केल्यास परवाना निलंबनाची कारवाई कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. कोणी साठेबाजी करत असल्यास कृषी विभागास कळवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.पथकाच्या उपस्थितीत पवार कृषी सेवा केंद्र टाकळी खंडेश्वरी, जनसेवा कृषी सेवा केंद्र माहीजळगाव येथे उडीद वाटप करण्यात आला.


पथकात कृषी अधिकारी भापकर, कृषी सहाय्यक तोरडमल, कृषी सहाय्यक भारती, कृषी सहाय्यक अडसूळ,कृषी सहाय्यक जवणे आदींसह कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होते.
ज्या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, बियाणे कुजण्याची शक्यता असते. अधिकृत कंपनीचे बियाणे घेऊन पेरणी करावी, बियाणे देताना कृषी सेवा केंद्रांनी लिंकिंग करू नये जास्त दराने विक्री करू नये. शेतकऱ्यांनी कृषी केंद्र कृषी सेवा केंद्र चालकांकडून बियाणे खरेदी केल्याची पक्की पावती घ्यावी , पावतीवर शेतकऱ्यांची दुकानदाराची सही असावी, बियाणे पेरून उगवेपर्यंत पावती जपून ठेवावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.