कर्जत, दि.९ जून (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी.चे नवनिर्वाचित कुलगुरू डाॅ.पी.जी.पाटील यांच्या बरोबर कृषी महाविद्यालय ,कृषी अभियांत्रिकी ,कृषी तंत्र निकेतन यांच्या अडीअडचणी वर चर्चासत्र सपंन्न झाले. या चर्चासत्रात गुजरात पॅर्टन प्रमाणे सहा सेमिस्टर चा इंग्लिश माध्यमातून कृषी तंत्रनिकेतन कोर्स महाराष्ट्रात चालू करणे.त्यासाठी लागणारे पायाभूत सुविधा तयार करणे. शुल्क रचना कशी असावी.त्यामध्ये असणारे मॉड्युलस वर्षभर विद्यार्थी कसे राबवणार यावर चर्चासत्र झाले.शिवाय हा कोर्स व्यवसायिक कोर्स म्हणून शासन दरबारी मान्य करून घेणे.नवीन वर्षासाठी कृषी महाविद्यालया,कृषी अभियांत्रिकी(बी.टेक) कृषी तंत्र निकेतन व इतर कृषी कोर्स साठी शासनाची परवानगी घेऊन स्वतंत्र परिक्षा मंडळ तयार करणे, इतर अडीअडचणी वर चर्चा झाली.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डाॅ.सुधीरजी तांबे,अधिष्ठाता डाॅ.ए.एल.फरांदे, निम्नस्तर शिक्षण अधिष्ठाता डाॅ.रणपिसे,सद्गुरू ऊद्योग समुहाचे संस्थापक ऊध्दवराव नेवसे, स्थायी समिती सदस्य वाफारे व विद्यापीठातील मान्यवर उपस्थित होते...यावेळी नवनिर्वाचित कुलगुरू डाॅ.पी.जी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ.रणपिसे यांनी आभार मानले.



