सार्वजनिक बांधकामचे  दुर्लक्ष, ठेकेदाराची मनमानी

कर्जत,दि.९ जून (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या 'महानेट ' या योजनेतुन ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देण्याची योजना चालु आहे . त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत . या साठी दुधोडी व भांबोरा ग्रामपंचायती मोबाईलकेबल ने जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या रस्त्याच्या कडेने जेसीबीने खोदकाम चालु असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे नुकसान झाले आहे . या कडे सार्वजनिक बांधकाम चे आधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे .

     भिमा पटयातील दलदलीचा भाग असणाऱ्या या गावातील रस्ते पन्नास वर्षानंतर डांबरीकरण झालेले आहेत . अशातच मोबाईल केबलचे काम चालु झाले आहे . यासाठी ठेकेदाराने कोणतेही नियम पाळले नाही . आनेक ठिकाणी रस्ता तोडला आहे. खड्डे तसेच आहेत . साईड घेताना वाहनांची चाके त्यामध्ये रूतुन बसत आहेत . उस वाहतुकीच्या वेळेस या खोदकामाची मोठी अडचण होणार आहे .

हे काम तातडीने बंद करून रस्त्याचे नुकसान न होता नियमानुसार करावे यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले . यावेळी राजेंद्र रणदिवे , नितिन वायकर , मिनिनाथ रणदिवे, राजेंद्र होलम , धनंजय रणदिवे , शरद रणदिवे उपस्थित होते .