कर्जत,दि.९ जून (प्रतिनिधी) : कर्जतचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीणकुमार गवांदे यांनी कुळधरण येथील किरण जगताप यांनी माळरानावर फुलवलेल्या सीताफळाच्या बागेची पाहणी केली. यावेळी कुळधरणचे मंडळाधिकारी हिंदुराव मोरे, कृषी सहाय्यक भाऊसाहेब वाघमारे यांच्यासह ग्रामविकास संघटनेचे अरुण तांबे, पोलीस पाटील समीर जगताप, बंडूकाका सुपेकर, कुमार जगताप, बंटीराजे जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी अधिकारी गवांदे यांनी कृषी विभागाच्या बांधावर वृक्ष लागवड, शेततळे व इतर योजनांची माहिती दिली. फळबागेसंबंधीच्या विविध शंकांचे निरसन करत मार्गदर्शन केले. जून-जुलै महिन्यात रोपांची लागवड करून जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. समीर जगताप यांनी आभार मानले.


