उडीद बियाणे वाटप करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ,गटविकास अधिकारी अमोल जाधव ,तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, कृषी अधिकारी रूपचंद जगताप व इतर

कर्जत, दि.१० जून (प्रतिनिधी) :  कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा उडीद लागवडीकडे कल वाढलेला असून यंदा तालुक्यातील उडीदाचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यात उडीद बियाणांचा तुटवडा नसून शेतकरी उडदाच्या निर्मल या वाणाची मागणी करत असल्याने उडीद बियाणे  खरेदीसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे, त्यामुळे कृषी विभागाकडून कर्जत मध्ये पोलीस बंदोबस्तात उडीद बियाणे वाटप करण्यात आले.

 आज दि. १० जून रोजी कर्जत मधील सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्रामध्ये निर्मल कंपनीचे उडीद बियाणे पोलिस बंदोबस्तात वाटप करण्यात आले.  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , गटविकास अधिकारी अमोल जाधव ,तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, कृषी अधिकारी रूपचंद जगताप, विस्तार अधिकारी तनपुरे, बनसोडे, मिसाळ,सभापती पती मा.दिलीपराव जाधव यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप केले.

यावेळी पोलीस कर्मचारी बळीराम काकडे व नितीन नरुटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.