गोपीचंद पडळकरांचा आमदार पवारांना टोला.

कर्जत (प्रतिनिधी)  : कर्जत जामखेड मध्ये पवारांचा नातू उभा राहतोय म्हंटल्यावर मतदार संघात वेगळच काम होईल असे कर्जत जामखेड मधील जनतेला वाटले. कुकडीचे पाणी जेव्हा यायचं तेव्हा तुमची पीक जळून गेली, आवर्तन फिक्स नाही. केंद्राकडे बोट ठेऊन बसतात, नरेंद्र मोदींना सल्ले देण्याचा प्रकार इथले आमदार करतात असा टोला आमदार गोपीचंद पडळकरांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. 
पडळकर सध्या कर्जत जामखेड मधील विविध भागात दौरे करून घोंगडी बैठकांचे आयोजन करून बहुजन समाजाशी संवाद साधत आहेत. कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील घोंगडी बैठकीत ते बोलत होते.सर्वांनी छोट्या छोट्या घटकातील लोकांशी बोलून उपेक्षित वंचित समाजाच्या लोकांचे माझ्याशी बोलणं करून द्या, तुमच्या सर्वांचे प्रश्न सभागृहात मांडणं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. असे पडळकर बोलताना म्हणाले. आपल्या पिढ्यानपिढ्या उध्वस्त झाल्या आहेत, पुढच्या पिढ्या उध्वस्त न होऊ देण्यासाठी जागरूक राहा, आपली मुलं चांगली शिकवा, शिका व राजकीय सामाजिक दृष्ट्या संघटित होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी अजित मासाळ, माऊली हाळनवर, म्हस्के, शेंडगे,तसेच थेरगाव, नागमठान ,चिंचोली रमजानचे ग्रामस्थ उपस्थित होते.