कर्जत,दि.१९ जून (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मिरजगाव शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार समारंभ व अपंग बांधवांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक अपंग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी दळवी, शिवसेना ज्येष्ठ नेते बळीराम यादव, शिवसेना नेते अमृत लिंगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, शिवाजी नवले, राशिनचे शिवसेना शहर प्रमुख मालोजीराजे भिताडे, नजीम काझी, कोंभळीचे माजी.सरपंच दीपकभाऊ गांगर्डे, संजय शेलार, शंकर धतुरे, बाळासाहेब दळवी, शहाजी मते, शहाजी धस, चंद्रकांत टकले, रमेश गवारे, रावण काळे, पोपट अमृत गांगर्डे, बाळासाहेब जगदाळे, धनवडे, संजय माने, मिरजगाव उपसरपंच आबासाहेब वीरपाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर पवळ, सलिम आतार, नागापूरचे माजी सरपंच बाळासाहेब निंबोरे, हरिभाऊ बाबर, मयूर चव्हाण, अमोल देशमाने, सुरज शेंडगे, विनोद तिकोने, अजय लिंगडे, आकाश पोटे, विशाल मराळ, दत्ता जाधव व सर्व शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी मिरजगाव शिवसेना शहर प्रमुख पदी बबन दळवी यांची निवड मा. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केली तसेच युवासेना शहर प्रमुख पदी मयुर चव्हाण यांची शिफारस करण्यात आली.या वेळी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व विविध योजनेचा लाभ गरजुना मिळण्यासाठी सत्तेचा उपयोग करुन घ्या असे आवाहन करण्यात आले.


