कर्जत (प्रतिनिधी) : व्याजाच्या पैशासाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून न्हेणाऱ्या सावकाराविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पो.स्टे.गु.र.नं. ३७८/२०२१ भा.द.वी. कलम ३९२,४५२,५०४,५०६,३४ व महाराष्ट्र सावकारकी कायदा कलम ३९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी वय ३३ वर्ष, रा.दळवी वस्ती, कर्जत ता.कर्जत जि. अहमदनगर फिर्यादी दिली की, दि.१७/०६/२०२१ रोजी सकाळी ११/०० वा.चे सुमा.यातील आरोपी नामे १) महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके व इतर 2 सर्व रा.नेटकेवाडी ता. कर्जत जि.अहमदनगर यांनी फिर्यादी व त्याचा भाऊ वैभव अंकुश दळवी यांचे घरात येवून फिर्यादीचे नातेवाईक यांना घरात घुसुन व्याजाने घेतलेले ५,५०,०००/-लाख रुपये व त्यावरील व्याजासह 10,00,000 रु द्या असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. फिर्यादीचा फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर त्याचा क्र.एम.एच.१६ एफ ६७६६ हा बळजबरीने चोरुन नेतांना म्हणाले की, आमचे १०,००,०००/-रु.द्या तेव्हा ट्रॅक्टर घेवून जा. जर तुम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुमची जमीन माझे नावावर करुन दे, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली आहे. वगैरे मजकुरचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी क्र. १) महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके रा.नेटकेवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर यास अटक करुन त्याचे कडुन फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर त्याचा क्र. एम. एच. १६ एफ ६७६६ हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलिम शेख, उद्धव दिंडे, अमित बर्डे, मनोज लातूरकर यांनी केली.

कर्जत तालुक्यातील नागरिकांना कर्जत ठाण्याकडून आवाहन करण्यात आले की कोणीही अवैध सावकारकी करु नये. कोणत्याही ग्रामस्थांना सावकाराकडुन वसुली साठी काही त्रास जसे वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तु उचलून नेणे अगर इतर कोणताही प्रकार होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा. कोणताही तक्रारदार हा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सावकारा कडुन होणार नाही, याची पोलीस काळजी घेतील.