कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील वालवड परिसरात अज्ञात इसमाने झाडाला बांधून ठेवलेल्या जखमी माकडाला प्राणिप्रेमीनी मुक्त करत जीवदान दिले आहे. परिसरात माकड दिसण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, कळपातून भरकटलेले माकड परिसरात पहायला मिळतात, जीवदान दिलेले माकड अज्ञात इसमाने पाळलेले असल्याचा अंदाज प्राणीप्रेमींकडून व्यक्त होत आहे.रस्त्याच्या कडेला बांधुन ठेवलेल्या माकडाला सोडून देत प्राणिप्रेमीनी प्राण्यांविषयी चे प्रेम व्यक्त केले आहे. याबाबत वनविभागास कळविण्यात आले होते, वनविभागाचे कर्मचारी माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडे माकड सुपूर्द करण्यात आले . जखमी झालेल्या त्या माकडाला उपचारासाठी वनपरिक्षेत्र रेहकुरी येथे नेण्यात आले. वनपाल रमेश पवार यांनी पंचनामा करून उपचार करून माकडाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. यावेळी अशोक वाळके,दादा खुरंगे, काळे उपस्थित होते.


