कर्जत (प्रतिनिधी) : वाहतुकीचे नियम पाळण्यामध्ये लॉकडाऊन नंतर थोडी शिथिलता आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकारी सहायक फौजदार दिलीप यादव, पोहेकॉ पाखरे, पोकॉ सचिन वारे, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, चालक पोना नरुटे असे सरकारी वाहनासह वाहतुकीचे तसेच कोव्हिड अनुषंगाने नियम मोडणाऱ्या नागरिकांना चांगलीच समज दिली तसेच कारवाया करण्यात आल्या.

वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी कर्जत पोलिसांनी दुकानाच्या पुढे दोऱ्या आखून दिलेल्या आहेत. आखलेल्या दोरीच्या बाहेर गाड्या न लावण्याबाबत पोलिसांनी समज दिली. दुकानात ग्राहक आल्यानंतर वाहने दोरीच्या आतमध्ये लावण्यास सांगावे याबाबत त्यांनी दुकानदारांना सूचना दिल्या.