कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यात सोमवारी  ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. कोंभळी , खांडवी , कौडाने, थेरगाव , मुळेवाडी, चांदे परिसरात पावसाने हजेरी लावली होती. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस पडत होता, पावसाने सगळीकडे पाणी पाणी झाले होते. शेतीला पाण्याची गरज असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांची तहान भागली आहे.

पावसाने तालुक्यातील थेरगाव येथील बबन शेख यांच्या घराची भिंत कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच शेख यांचे पत्र्याचे शेड ही कोसळले आहे. तसेच लखन सकट यांच्या घराची पावसाने पडझड झाली आहे.  अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले होते, काही पिके भुईसपाट झाली आहेत. पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.