कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथे नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले , कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाफेड मार्फत पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कं.लि व शिवशक्ती फार्मर प्रोड्युसर कं.लि यांच्या संयुक्त विद्यमानाने PSF 2020 - 21 कांदा खरेदी केंद्र मुळेवाडी येथे दिनांक ३१ मे २०२१ रोजी सुरू झाले.या केंद्राचे उदघाटन मिरजगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव संपतराव सुर्यवंशी , कृषी अधिकारी रुपचंद जगताप व शिवशक्ती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे CEO विनीत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कांदा खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना नाफेड च्या रोजच्या बदलत्या दरानुसार भाव मिळणार आहे.त्यामध्ये प्रतवारी केलेला एक नंबर व दोन नंबर या पद्धतीचा माल घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना पेमेंट हे नाफेड मार्फत त्यांच्या थेट खात्यावर केले जाणार आहे.
यावेळी मुळेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब जगताप,मा. उपसरपंच दत्तात्रय मुळे, ग्रा.प.सदस्य डॉ.सुनील मुळे,कृषी सहाय्यक अविनाश सुद्रीक, चेअरमन संजय मुळे,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नितीन मुळे, पत्रकार योगेश गांगर्डे, योगेश मुळे ,माजी सैनिक रावसाहेब मुळे, उपसरपंच गंगावणे ,संभाजी टकले, सुनील कवडे, सागर गंगावणे, स्वप्नील मुळे , युवराज गांगर्डे,रविंद्र भापकर आदी उपस्थित होते.
कांदा विक्री साठी शेतकऱ्यांनी उदयराजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मुळेवाडी येथे संपर्क करण्याचे आवाहन संचालक अमोल जगताप , राहुल जगताप, उदयराजे जगताप यांच्या वतीने करण्यात आले.



