
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे 1 जून रोजी सेल्फ रिलायन्स फार्मर्स प्रोड्यूसर कं लि या शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत 'अँग्री मॉल ' च्या कोभळी शाखेचे उदघाटन करण्यात आले. कोरोनामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ऍग्री मॉलचे उद्घाटन पार पडले. खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानदेव गांगर्डे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी अँग्री मॉल चे संचालक तुषार गांगर्डे म्हणाले कि कंपनीतर्फे सर्व कंपनीचे सभासद शेतकरी बांधव यांच्या पिकाचे व्यवस्थापन ते विक्री या सर्वांसाठी मार्गदर्शन करून या क्षेत्रातील सर्व सेवा कंपनीतर्फे उपलब्ध करण्याचा मानस आहे.थोड्याच दिवसामध्ये प्रोसेसिंग युनिट,ग्रेडिंग,पॅकिंग चालू करून त्यामधून शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला योग्य दर मिळन्यासाठी प्रयत्न करण्याचा कंपनी संचालकांचा मानस आहे. मोठ्या प्रमाणावर खते, दर्जेदार बि बियाणे, औषधे याची उपलब्धता योग्य दरामध्ये करून शेतकऱ्यांना आपली उत्पादकता वाढविण्यासाठी कंपनी कडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच सभासदांसाठी शेतीपूरक उद्योगांसाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन, विक्री व्यवस्थापन व भांडवल पुरवण्याचा व याकडे नुसते एक उद्योगी म्हणून न पाहता उपयोगी कसे होता होईल असा मनोदय एसआर अँग्रो कंपनीचे मुख्य प्रवर्तक / संचालक एस आर गांगर्डे यांनी बोलताना व्यक्त केला तसेच "बळीराजा" स्वावलंबी होण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे हे कंपनीचे ब्रीद आहे. याप्रसंगी चैतन्य उद्योगसमूहाचे सुरेश गोरखे,भाजपा तालुका उपाध्यक्ष शेखर खरमरे, कोंभळीचे सरपंच राहूल गांगर्डे, मा. सरपंच दिपक गांगर्डे, मा.सरपंच पै सचिन दरेकर, सीताराम गांगर्डे,दत्तात्रय काकडे,बबनदादा तापकीर, पोलीस पाटील शरद भापकर,रुपचंद गांगर्डे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

