कर्जत (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती पाहता कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सदगुरु उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवशेठ नेवसे यांचे चिरंजीव स्विकार नेवसे यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च सामाजिक संस्थांना मदत म्हणून देवून वाढदिवसाच्या इतर खर्चाला फटा देत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
कर्जत तालुका सावता परिषदेचे युवा तालुकाध्यक्ष स्विकार भैय्या नेवसे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. इतर खर्चाला फटा देत कर्जत येथील नगरपंचायत याठिकाणी वृक्षाचे भेट देऊन येथील विविध सामाजिक संस्थेंकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्षसंवर्धन उपक्रमास वृक्षसंवर्धनाकरिता आर्थिक मदत म्हणून पाच हजार रूपयांचा धनादेश दिला.
तर तालुक्यातील हंडाळवाडी या ठिकाणी गोविंद महाराज गो-शाळा या असलेल्या गो शाळेतील गायींना ह.भ.प.लक्ष्मण शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत चारा वाटप तसेच सदगुरू कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
संत गजानन महाराज पतसंस्था मिरजगाव तसेच मिरजगाव, राशिन, कर्जत, माहिजळगाव येथील सदगुरू मल्टीस्टेट को.ऑफ बॅंक आदी शाखेत वाढदिवस निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. मिरजगाव येथील कार्यक्रमास सदगुरू उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवशेठ नेवसे, सदाबापू शिंदे, विनीत गांधी, शाखेतील सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. तर कर्जत येथे नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोविंद जाधव, रोटरी क्लबचे विशाल म्हेत्रे, सचिन धांडे, तात्यासाहेब क्षिरसागर, विजय तोरडमल, नितीन देशमुख, रानमाळ मेजर, घनश्याम नाळे आदी उपस्थित होते.
यावेळी नेवसे म्हणाले, आपण नेहमीच वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाला होणारा खर्च सामाजिक संस्थांना देवून सामाजिक बांधिलकी व कुटुंबियातील संस्कार जोपासत आहोत. समाजातील इतरांनी देखील वाढदिवसाला होणारा खर्च सामाजिक संस्थांना देवून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



