कर्जत, दि ४ जुन(प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत अभिनव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय लाढाणे यांनी दिली.

धनंजय लाढाणे म्हणाले की, कोरोनाचा वाढता कहर पाहता नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी गरजेची आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सर्व सोयींचा उपयोग करून जास्तीत जास्त संख्येने तपासणी घ्यावी. तपासणीनंतर पुढील उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांना शिबिराचे आयोजन करायचे असल्यास सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

९९६०९६४२६६ / ९७६६९०९९३६