पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना नवयुग प्रतिष्ठानचे सदस्य.
कर्जत, दि.५ जुन(प्रतिनिधी) : आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन... पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने विविध माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जनजागृती होत असते. तसंच दिवसेंदिवस झाडे वाढली पाहिजेत, यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे, असा आग्रह होत असतो. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नवयुग प्रतिष्ठानच्या वतीने फक्त जनजागृती न करता प्रत्यक्ष कृती करून वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण दिनाचे महत्व व वृक्षारोपण जनजागृती म्हणून नवयुग प्रतिष्ठानच्या वतीने मिरजगाव येथील काळामारुती मारुती मंदिर परिसर व भरती बाबा मठ येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नवयुग प्रतिष्ठान चे व ग्रा.पं.सदस्य.सागर पवळ, ग्रा.पं सदस्य सलीम आतार, विशाल वीरपाटील,गणेश पवळ, प्रताप जंजिरे, राम रणदिवे, संकेत धोंगडे,रवींद्र वायफळकर,लतीफ तांबोळी, सोमनाथ वाघ आदी उपस्थित होते